पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय

भयमुक्त शहर बनवण्यासाठी आम्ही कटीबद्ध

पिंपरी-चिंचवड शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले होते. त्यावेळी पुणे पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत शहराचा समावेश होता. पिंपरी-चिंचवडमध्ये स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरू झाल्यास शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर लगाम बसेल, अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा होती. शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावी. यासाठी आम्ही विधीमंडळात पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाबाबत आग्रही मागणी केली. त्याला राज्य सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला. पिंपरी- चिंचवडची लोकसंख्या २२ लाखांच्या जवळपास आहे. याशिवाय चाकण, तळेगावचा विचार करता भविष्यात ही लोकसंख्या आणखी वाढणार आहे. वाढते औद्योगिकीकरण आणि शहरीकरणामुळे गुन्हेगारी, जमिनीचे वाद आणि अन्य कारणांमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये स्वतंत्र आयुक्तालयाची नितांत गरज होती.

२०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शहरवासीयांना आम्ही स्वतंत्र पोलीस आयुक्तालय उभारण्याबाबत आश्वासन दिले होते. राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी यांनी याकामी लक्ष घातले. गृहखाते स्वत: मुख्यमंत्र्याकडे असल्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कामाला चालना मिळाली. १५ ऑगस्ट २०१८ रोजी पोलीस आयुक्तालयाच्या प्रत्यक्ष कामकाजाला सुरूवात झाली. चिंचवडमधील प्रेमलोक पार्क येथे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे मुख्यालय आहे. पिंपरी-चिंचवडची वाढती लोकसंख्या पाहता पोलिसांच्या कामात सुलभता, अधिक परिणामकारकता आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

पोलीस आयुक्‍तालयाचे फायदे काय?

  • शहरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित राहील.
  •  वाहतूक विभागामुळे वाहतूक सक्षमीकरणास मदत.
  • पिंपरी-चिंचवड शहराची स्वतंत्र ओळख निर्माण झाली.
  •  पोलीस प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता.
  • नागरिकांच्या तक्रारींची तात्कळ दखल घेतली जात आहे.
  • नवीन चिखली पोलीस स्थानकाची निर्मिती.
  • पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना पोलीस खात्यातील कामासाठी पुणे पोलीस आयुक्‍तालयावर अवलंबून रहावे लागत होते. पण, आता शहरातील नागरिकांना तक्रार दाखल केल्यानंतर तात्काळ दखल घेतली जात आहे.
  • औद्योगिक सुरक्षा, महिला सुरक्षा या महत्त्वांच्या प्रश्नांकडे आता पोलीस प्रशासन विशेष लक्ष देत आहे. त्यासाठी स्वतंत्र सेल सुरू करण्यात आले आहेत.