समस्या अनेक पर्याय फक्त एक

परिवर्तन हेल्पलाईन सेवा

२०१५ पासून भोसरी मतदार संघातील

नागरी व सामाजिक समस्या सोडविण्यासाठी कार्यरत

संगणकाच्या युगात सर्वसामान्य नागरिकांना आपल्या दैनंदिन समस्या तात्काळ सोडविता याव्यात. नागरी समस्यांबाबत नागरिकांच्या मनामध्ये लोकप्रतिनिधींबाबत उदासीनतेची भावना असते. मात्र, भोसरी परिसरातील नागरिकांना आपल्या समस्या तात्काळ सोडविता याव्यात यासाठी आम्ही परिवर्तन” हेल्पलाइन सुरु केली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना आपल्या समस्या सोडविण्यास मदत होत असून, प्रशासकीय अधिका-यांनाही काम करण्यास सोपे झाले आहे. विशेष म्हणजे, गेल्या तीन वर्षांत हजारो तक्रारी निकालात काढल्यामुळे “परिवर्तत*ला “आयएसओ” मानांकन प्राप्त झाले आहे. “९३७९९०९०९०” या संपर्क क्रमांकावर नागरिकांना आपली तक्रार नोंदवता येते. ही सुविधा व्हॉट्सअॅपवरही उपलब्ध केली आहे.

कसे आहे परिवर्तनचे कामकाज

भोसरी मतदार संघामध्ये बदल घडवून आणण्याचे अभिवचन महेश लांडगे यांनी मतदारांना दिले होते. त्यानुसार, शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, मतदार संघातील विविध प्रश्न सोडविणे, महिला व युवकांचे संघटन, त्यांच्यासाठी रोजगार उपलब्ध करुन देणे, विविध अभिनव योजना राबविणे आदी कामे कार्यालयामार्फत केली जातात. नोकरी विषयक“एचआर” विभाग कार्यरत आहे. विशेष म्हणजे, भोसरी मतदार संघातील प्रत्येक प्रभागनिहाय एक आमदार कार्यालय स्वयंसेवकाची नियुक्ती केली आहे. त्याद्वारे त्या-त्या विभागातील तक्रारी-समस्यांचे निराकरण केले जाते.

परिवर्तन हेल्पलाईनचे प्रमुख विभाग

  • मंत्रालय संबंधी कामकाज
  • आरोग्य विषयक विभाग
  • महापालिका संबंधी कामकाज
  • शैक्षणिक योजना विभाग
  • नोकरी विषयक सल्ला विभाग
  • नागरी समस्या निराकरण
  • सामाजिक संस्था संघटना समन्वय
  •  महिला समस्या निराकरण विभाग
  • नगरसेवक समन्वय समिती

तब्बल ५० हजाराहून अधिक समाधानी नागरिक

परिवर्तन हेल्पलाईन सुरू केल्यापासून भोसरी विधानसभा मतदारसंघातील सुमारे ५० हजारहून अधिक नागरिकांच्या समस्या सोडवण्यात आम्हाला यश मिळाले आहे. प्रशासकीय कामात सूसुत्रता आली असून, महापालिकासह अन्य शासकीय विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही परिवर्तन हेल्पलाईन सुविधेचा फायदा होत आहे.