महिला सक्षमीकरण, उद्योजकता विकास, नवोदितांना संधी या हेतुने “इंद्रायणी थडी महोत्सव-2025” चे आयोजन केले आहे. अल्पावधीतच या महोत्सवाने संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रियता मिळवली आहे.
खरं तर, २०१९ पासून आपण ‘इंद्रायणी थडी’ महोत्सव भरवतो. शिंवाजली संखी मंच, अनेक स्वंयसेवी संस्था-संघटना आणि स्वयंसेवकांच्या पुढाकाराने आपण पुणे-पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागातील अबालवृद्धांसाठी भरगच्च कार्यक्रमांची पर्वणी घेवून आलो आहोत.
यावर्षी हिंदूभूषण छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र, पुणे-नाशिक रोड, मोशी, पिंपरी-चिंचवड येथे दि. २७ फेब्रुवारी २०२५ – ०२ मार्च २०२५ (४ दिवस) इंद्रायणी थडी महोत्सव होणार आहे.
महाराष्ट्रातील महिला सक्षमीकरण आणि महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी आपण या महोत्सवाला आवर्जुन सकाळी-१० ते रात्री १० या वेळेत भेट द्यावी. विविध कार्यक्रम, उपक्रम आणि उत्पादने खरेदीचा आनंद लुटावा. त्याद्वारे महिला सक्षमीकरण उपक्रमाला निश्चितपणे प्रोत्साहन मिळणार आहे.
सस्नेह निमंत्रण..!
विसरु नका या घडीला… चला इंद्रायणी थडीला..!
महेश किसनराव लांडगे.
शहराध्यक्ष तथा आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड.
महोत्सवाची वैशिष्टे
2000 पेक्षा अधिक स्टॉल
800 पेक्षा जास्त महिला बचत गट
अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर भव्य प्रतिकृती
बाल-गोपाळांसाठी मोफत बालजत्रा
महाराष्ट्राचे लाडके विनोदवीर
सिनेतारका नृत्य
महिला भगिनींसाठी
योगा, झुंबा, फॅशन शो, मेकअप आणि विविध स्पर्धा
ग्राम संस्कृती, खाद्य संस्कृती
भजन महोत्सव
नोकरी महोत्सव
1500 पेक्षा जास्त चारचाकी वाहनांसाठी प्रशस्त पार्किंग व्यवस्था अशा महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या महोत्सवाचे साक्षीदार व्हा….