इंद्रायणी थडी

महिला सक्षमीकरणासाठी विधायक उपक्रम

भोसरी विधानसभा मतदारसंघात महिला बचतगटांचा उपयोग केवळ निवडणुकांच्या तोंडावर मतांचा जोगवा मागण्यासाठी केला जात होता. मात्र, माझ्या मतदारसंघातील माता-भगिनींसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे. याकरीता आम्ही शिवांजली सखी मंचच्या पुढाकाराने“इंद्रायणी थडी” जत्रेचे आयोजन केले होते. महाराष्ट्रभर नावलौकिक निर्माण झालेल्या जत्रेला चार दिवसांमध्ये तब्बल ५ लाख नागरिकांनी भेट दिली.

भोसरी मतदारसंघातील ५८० महिला बचतगट व वैयक्तिक महिलांनी या जत्रेत सहभाग दर्शवला. या जत्रेत सुमारे ४.५ कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सौभाग्यवती अमृता फडणवीस आणि महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली होती. इंद्रायणी थडीच्या माध्यमातून लहान मुलांसाठी बालजत्रा, महिलांसाठी भजन स्पर्धा, गावरान खाद्य महोत्सव, महिला आरोग्य शिबीर, फॅशन शो, डान्स स्पर्धा, महिला उद्योजकता मार्गदर्शन, होम मिनिस्टर कार्यक्रम, महिलांसाठी पारंपरिक खेळ, महिलांसाठी जॉब फेअर, योग व झुंबा ऐरोबिक्स प्रशिक्षण आदी उपक्रम राबवण्यात आले होते. यापुढेही अशाच प्रकारे महिला सक्षमीकरणाबाबत आम्ही विविध उपक्रम हाती घेणार आहोत.

पुण्यात आयोजित केली जाणारी “भीमथडी”, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित केली जाणारी “पवना थडी” अशा जत्रेच्या धर्तीवर भोसरीसह समाविष्ट गावांसाठी स्वतंत्र जत्रा आणि कार्यक्रम आयोजित केले जावेत, अशी अपेक्षा येथील स्थानिक नागरिक आणि महिलांची होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत आम्ही, शिवांजली सखी मंचच्या माध्यमातून भव्य “इंद्रायणी थडी” यात्रा सुरू केली. त्याला परिसरातील महिला आणि बचत गटांनी उदंड प्रतिसाद दिलेला आहे. बचतगट चळवळ बळकट करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण उपक्रम लक्षवेधी ठरला आहे.

गॅलरी