महेश लांडगे

A rare Indian politician personality and member of the Bharatiya Janata Party. He is a member of the Maharashtra Legislative Assembly from the Bhosari constituency from the city of Pune as Independent candidate. Previously he was a corporator in PCMC. Before entering into politics he was a well-known wrestler.

आमच्या संस्था

प्रकल्प

जलद आणि किफायतशीर प्रवास सुविधा

पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी भाजप सरकारने स्वारगेट ते पिंपरीपर्यंत मेट्रो हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला. पण, शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी पिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो साकारण्यात यावी, अशी नागरिकांची मागणी होती. त्यासाठी शहरातील विविध सामाजिक संस्था, संघटनांनी आवाज उठवला होता. अशा संस्था, संघटनांना पाठिंबा दर्शवत आम्ही राज्य आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. त्याला यश मिळाले आहे. केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर निगडीपर्यंतच्या मेट्रोचे काम सुरू करण्यात येणार आहे.

नमामी इंद्रायणी

देहू-आळंदी तीर्थक्षेत्रांच्या परिसरात वाहणाऱ्या इंद्रायणी नदीची स्थिती बिकट झाली होती. भोसरी व्हीजन-२०२० अभियानाच्या माध्यमातून आम्ही इंद्रायणी नदीसुधार प्रकल्पासाठी सर्वेक्षण केले. त्यामध्ये भराव टाकलेली ठिकाणे, पात्रालगतची गॅरेज, हॉटेल व बांधकामांची माहिती संकलित केली. तसेच, थेट नदीपात्रात मिसळणारे सांडपाणी, नाल्यांची माहिती घेतली आहे. निळी व लाल पूररेषा विचारात घेऊन नद्यांचा विकास करण्याचा संकल्प आहे. त्यासाठी महसूल विभागाकडून नदीपात्राची माहिती, नकाशे मिळविण्यात आले आहेत. तसेच, इंद्रायणी नदीसुधार प्रकल्पाच्या कामालाही सुरुवात झाली आहे.

P 3

वेस्ट-टू-एनर्जी

शहरातील पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेला “वेस्ट-टू-एनर्जी’ (कच-यापासून वीजनिर्मिती) हा प्रकल्प आम्ही हाती घेतला. हा प्रकल्प राज्यातील “रोल मॉडेल” आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातून सद्यस्थितीला मोशी कचरा डेपोवर प्रतिदिन सुमारे ९०० ते १००० मेट्रिक टन कचरा येत आहे. कचरा डेपोसाठी तब्बल ८१ एकर जागा १९९२ पासून महापालिकेच्या ताब्यात आहे. त्याठिकाणी मेकॅनिकल कंपोस्टिंग प्लॅन्ट, गांडूळ खत प्रकल्प, प्लॅस्टिकपासून इंधन निर्मिती असे प्रकल्प कार्यान्वीत केले आहेत. तसेच, कचरा डेपोमध्ये २० ते २२ एकर जागेवर गेल्या २० वर्षांपासून “ओपन डम्पिंग केले जात आहे.

स्मार्ट सिटी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील १०० शहरे स्मार्ट बनवण्याचे स्वप्न पाहिले आहे. स्मार्ट सिटी ही संकल्पना प्रत्यक्षात आल्यानंतर या शहरातील नागरिकांचे जीवन सुसह्य होणार आहे. शहरातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी पायाभूत सुविधा, स्वच्छ पर्यावरण, काही नव्या योजनांचा अवलंब यावर स्मार्ट सिटी योजनेत भर देण्यात येणार आहे. शुद्ध पाणीपुरवठा, वीजेची शाश्‍वत उपलब्धता, सॅनिटेशन, सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प, प्रभावी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, माहिती-तंत्रज्ञान सुविधा, वेगवान शहरी सुविधा, ई-गव्हर्नन्स आणि लोकांचा सहभाग, नागरी सुरक्षितता आदी पायाभूत बाबी या स्मार्ट सिटीत असणार आहेत.

एकूण प्रकल्प
पूर्ण झालेले प्रकल्प
चालू प्रकल्प

गॅलरी