MD स्पोर्ट्स फौंडेशन आणि व्हीजन अकॅडमी

महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशन

महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशन ही संस्था गेल्या १५ वर्षांपासून सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक क्षेत्रात कार्यरत आहे. प्रत्येक वर्षी भव्य दहीहंडी, गणपती उत्सव, नवरात्रोत्सव आणि महाशिवरात्रीनिमित्त होणारा कीर्तन महोत्सव असे विविध सामाजिक उपक्रम फाउंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात येतात. तसेच, कराटे, ज्युडो, तायक्कांदो, किकबॉक्सिंग, तलवारबाजी, रायफल शुटिंग, बॉक्सिंग, मॅरेथॉन, उशु आदी क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात. तसेच, फाउंडेशनच्या सहकार्याने महिला कबड्डी संघ कार्यरत आहे. सुमारे ७० कबड्डीपट्टू सराव करीत आहेत. कुस्ती संकूलही सुरू आहे. त्यामध्ये ३० ते ३५ कुस्तीपटू तालमीत कुस्तीचा सराव करीत आहेत. यासह व्हॉलीबॉलचाही संघ तयार करण्यात आला आहे. बॅडमिंटन हॉल विकसित केला असून, त्याद्वारे स्पर्धाही आयोजित केल्या जातात. फाउंडेशनच्या वतीने प्रतिवर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये क्रीडा सप्ताह आयोजित केला जातो.

भवानी तालीम

फाउंडेशनच्या माध्यमातून भवानी तालीमचे कामकाज पाहिले जाते. याठिकाणी ५० मुले आणि १० मुली कुस्तीचे प्रशिक्षण घेत आहेत. शालेय कुस्ती स्पर्धा, महापौर चषक कुस्ती स्पर्धा आदी स्पर्धांचे आयोजन तालीम प्रशासनाच्या माध्यमातून केले जाते. विशेष म्हणजे, माझे वडील वस्ताद श्री. किसनराव लांडगे या तालमीमध्ये कुस्तीपटूंना प्रशिक्षण देत आहेत.तसेच २०१३ साली राज्यस्तरीय मानाची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा उत्कृष्टरित्या स्पर्धेचे आयोजन प्रथमच भोसरी येथे करण्यात आले.

मुलींचा कबड्डी संघ

भोसरीसह पिंपरी-चिंचवडमधील महिला कबड्डीपटूंसाठी स्वतंत्र संघ अस्तित्वात नव्हता. मात्र, फाउंडेशनच्या माध्यमातून प्रथमच मुलींचा कबड्डी संघ तयार केला आहे. संघाच्या माध्यमातून ७० ते ८० मुली सरावासाठी नियमित मैदानावर येत आहेत. राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा, खेलो इंडिया आदी महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये संघाच्या खेळाडुंनी प्रतिनिधीत्व केले आहे. तसेच, पूजा शेलार कबड्डीपटूला शिवछत्रपती पुरस्काराने राज्य शासनाने सन्मानित केले आहे. फाउंडेशनच्या माध्यमातून दर्जेदार मैदान आणि मॅटहॉल उपलब्ध करुन दिला आहे.

MD व्हीजन अकॅडमी

तरुण घडले, तर देश घडणार आहे…या संकल्पनेतून तरुणांना मार्गदर्शन व रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने या अँकॅडमीची सुरूवात करण्यात आली आहे. अकॅडमीच्या माध्यमातून पोलीस आणि सैनिक भरती मार्गदर्शन, भरतीसाठी लागणारी कागदपत्रे, शारीरिक तपासणी व अभ्यासक्रम याबद्दल तरुणांना माहिती दिली जाते. शासकीय सुरक्षा रक्षक प्रशिक्षण उपक्रमाच्या माध्यमातून अकॅडमीने अनेक मुलांना नोकरी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. विशेष म्हणजे, महेशदादा व्हीजन अकॅडमी ही शासनमान्य संस्था असून, बहुउद्देशीय व राष्ट्रीय कंपन्यांमध्ये सुरक्षा अधिकारी, सुरक्षा रक्षक म्हणून युवकांना प्रशिक्षण देऊन संधी उपलब्ध करुन देत आहे. या माध्यमातून भरती झालेल्या युवकांना किमान १३ हजार रुपये ते कमाल ३० हजार रुपयांपर्यंत वेतनाची नोकरी उपलब्ध होत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून पुणे, पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील सुमारे २५०० मुला-मुलींना नोकरीची संधी मिळाली आहे. सायबर क्राइम, इंटरनेटची खबरदारीबाबत जनजागृती करण्यात येते. तसेच, अँकॅडमीच्या माध्यमातून शाळा, कॉलेज व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आपत्कालीन परिस्थितीत बचावात्मक प्रशिक्षण देण्यात येते. विशेष म्हणजे, भारतीय वायू सेना आणि अकॅडमीच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यात प्रथमच भोसरीमध्ये वायू सेना भरती कॅम्प घेण्यात आला होता. या कॅम्पमध्ये तब्बल ८ हजाराहून अधिक मुलांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी १९० मुलांना वायु सेनेत भरती होण्याची संधी मिळाली आहे.

गॅलरी