अर्बन स्ट्रीट डिझाइन

भोसरी उड्डाण पुलाखाली साकारणार

पुणे-नाशिक महामार्गावर भोसरी येथे उड्डाणपूल उभारण्यात आला. नियोजनाअभावी उड्डाणपूलाखाली वाहतुकीचा बोजवारा उडाला. ट्रॅव्हल्स आणि बसचे नियमबाह्य पार्किंग, अतिक्रमण, पथारीधारकांचे स्टॉल्स, मजूर अड्डा यामुळे वाहतूक विस्कळीत होती. त्यामुळे भोसरीचा उड्डाणपूल म्हणजे, वाहनचालकांसाठी डोकेदुखी असे समीकरण झाले होते. त्यामुळेच २०१४ च्या निवडणुकीत आम्ही वाहतूक कोंडी आणि नियोजन अभावामुळे “श्‍वास” कोंडलेल्या भोसरी उड्डाणपुलाखाली वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यात येईल, असे अश्वासन नागरिकांना दिले होते. त्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी विदेशातील वाहतूक व्यवस्थेच्या धर्तीवर भोसरी उड्डाण पुलाखालील वाहतुकीचे “अर्बन डेव्हलपमेंट’ संकल्पनेअंतर्गत नियोजन करण्यात येणार आहे. रस्त्याच्या दुतर्फा वॉकिंग ट्रॅक, सायकल ट्रॅक, पथारी व्यावसायिकांसाठी स्वतंत्र व्यवस्था, दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था, गार्डन, ई- टॉयलेट आदी प्रकल्पाची निविदा प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

  • रस्त्याच्या दुतर्फा वॉकिग ट्रॅक
  • स्वतंत्र सायकल ट्रॅक
  • पथारी व्यावसायिकांसाठी स्वतंत्र व्यवस्था
  • दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था
  •   गार्डन, ई-टॉयलेट