आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र

आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र

मोशी येथे पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व कन्व्हेशन केंद्र उभारण्यात येणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सुमारे ९७५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. डेट्राईट ऑफ इस्ट अशी ओळख असलेल्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये भव्य प्रदर्शन केंद्राची अत्यंत गरज होती. या प्रदर्शन केंद्राच्या निमित्ताने उद्योगजगताकडून होणाऱ्या मागणीला आता मूर्त स्वरुप मिळाले आहे.

विशेष म्हणजे, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी डिसेंबर २०१४ पर्यंत ५३.९ कोटी रूपये प्राधिकरण प्रशासनाने खर्च केले आहेत. तसेच, सन २०१५-१६ साठी प्राधिकरणाकडून ४६.९१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. त्यामुळे उर्वरित ८७५ कोटी रुपयांच्या तरतूदीसाठी राज्य शासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे.

आशिया खंडातील सर्वांत मोठे प्रदर्शन केंद्र

मोशीत आशिया खंडातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र निर्माण होत आहे. त्याचे भूमिपूजन तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आले. या केंद्रामुळे अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांची उत्पादने विक्रीसाठी व्यासपीठ तयार होणार आहे. तसेच, स्थानिक कंपन्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होणार आहे.

प्रदर्शन केंद्राची वेशिष्टे

  • एकूण तीन प्रदर्शन हॉल
  • कन्व्हेंशन सेंटर
  • खुल्या प्रदर्शनासाठी मोकळे मैदान
  • वाणिज्य वापरासाठी राखीव क्षेत्र
  • पंचतारांकित हॉटेल
  • सब डिस्ट्रिक्ट सेंटर
  • मेट्रो आणि बस टर्मिनस
  • हॅलिपॅड
  • अंतर्गत रस्ते, लॅन्डस्केपिंग, पार्किंग

व्यावसायिक / भूमीपुत्रांना होणारे फायदे

  • व्यावसायिक दळण-वळणला चालना मिळेल.
  • नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
  • औद्योगिक आणि कृषि प्रदर्शनामुळे व्यावसाय संधी.
  • उद्योगधंद्यांना चालना मिळेल. गुंतवणूक वाढणार आहे.
  • लघुउद्योजक, बचत गटांसाठी व्यासपीठ
  • हॉटेल व्यावसायला चालना मिळेल.