आरोग्य सुविधा : स्वच्छ भारत अभियान

आरोग्य सुविधा : स्वच्छ भारत अभियान

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत वैयक्‍तीक शौचालय/ सार्वजनिक शौचालय उभारण्याची योजना हाती घेतली आहे. वैयक्तिक घरगुती शौचालयाचे बांधकाम अनुदान वाटप केंद्र शासनाने संपूर्ण देशात दि. २ ऑक्टोबर २०१४ पासून सुरू केले आहे. त्यासाठी स्वच्छ भारत अभियान (नागरी) राबिवण्याची घोषणा केलेली आहे. सदर अभियानाच्या अनुषंगाने शहरातील ज्या कुटुंबाकडे स्वत:चे शौचालय नाही, त्यांना शौचालय उभारण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. या योजनेद्वारे शहर हागणदारी मुक्‍त करणे हा या अभियानाचा मूळ उद्देश आहे. महाराष्ट्र शासनानेदेखील केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानच्या धर्तीवर राज्यामध्ये स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबवण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

घरगुती शौचालय उभारणी अनुदान योजना

दि. १२ ऑगस्ट २०१५ पासून महापालिकेच्या एकूण ८ क्षेत्रीय कायार्लयाअंतगर्त सुरु करणेत आली आहेत. यासाठी राज्य अनुदान व मनपा हिस्सा यामधून केंद्र शासनाचे र. रु ४०००/-, राज्य शासनाचे र. रु. ८०००/- व मनपा हिस्सा रु. ४०००/- याप्रमाणे एकूण १६०००/- रुपये वैयक्तिक घरगुती शौचालय बांधणेसाठी अनुदान अदा करणेत येते. सदर अभियानात लाभार्थी पात्र ठरल्यानंतर र. रू ८०००/- व शौचालय बांधकाम पूर्ण झाल्यानंतर र. रू ८०००/- थेट लाभार्थ्याच्या बॅक खात्यावर जमा केले जातात.

प्रत्येक गावात सुसज्ज रुग्णालय व मदर अँड चाइल्ड युनिट

“भोसरी व्हीजन २०२० मध्ये नागरीक हाच केंद्र बिंदू आहे. भोसरी मतदार संघात शहरातील गरीब आणि गरजू रुग्णांना कमीत कमी दरात आवश्यक ते उपचार मिळावेत, यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने किंवा राज्य शासनाच्या मदतीने प्रत्येक गावात सुसज़ रुग्णालय उभारण्याचा आमचा संकल्प आहे. तसेच, दिघी येथे उभारण्याची प्रक्रिया सुरू असलेले मदर अँन्ड चाईल्ड युनिटच्या धर्तीवर भोसरी मतदार संघातील प्रमुख गावांमध्ये असे युनिट उभारण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.

आरोग्य वेधशाळा

केंद्र सरकारचा आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग व निती आयोगाच्या सूचनांनुसार मतदार संघामध्ये आम्ही हेल्थ ऑब्झरव्हेटरी हा उपक्रम राबवित आहोत. यामध्ये वन पेशंट; वन रेकॉर्ड या धर्तीवर सर्व रुग्णांची माहिती ऑनलाईन पद्धतीने एकत्रित केली जाईल. त्यांना हेल्थकार्ड दिले जाईल. यामुळे आरोग्य सेवा मिळवणे आणि रेकॉर्डचे जतन करणे सुलभ होणार आहे.