उद्यान विकास आणि पायाभूत सुविधा

उद्यान विकास आणि पायाभूत सुविधा

भोसरी मतदार संघातील नागरिकांना तणावमुक्त जीवन जगता यावे. यासाठी ठिकठिकाणी उद्यान विकसित करावे, अशी आमची संकल्पना आहे. त्यामुळे भोसरी व्हीजन-२०२० उपक्रमांतर्गत आम्ही उद्यान विकास आणि पायाभूत सोयी-सुविधा यावर भर दिला आहे. त्याची सुरूवात इंद्रायणीनगरमधून करण्यात आली. सध्या मतदार संघात एकूण ७ ठिकाणी उद्यानाचे काम होणार आहे. त्यापैकी १ उद्यानांचे काम पूर्ण झाले आहे. अन्य ६ उद्यानांचे काम प्रगतीपथावर आहे. भविष्यात ही सर्व उद्याने ऑक्सिजन पार्क आणि नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र म्हणून ओळखली जातील, असे आमचे व्हीजन आहे.

मतदार संघामध्ये कुठे होणार उद्यान?

  • पेठ क्रमांक ४, संतनगर.
  • पेठ क्रमांक ३, इंद्रायणीनगर.
  • पेठ क्रमांक ४, मोशी- प्राधिकरण.
  • जाधववाडी- चिखली
  • मोशी, हवालदार वस्ती.
  • वाघेश्वर मंदीर परिसर, चऱ्होली.

उद्यानची वैशिष्टे

  • जॉगिंग ट्रॅक
  • मुलांसाठी प्ले एरिआ.
  • व्यायाम आणि योगासाठी लॉन
  • देशी प्रजातीच्या वृक्षांची लागवड
  • ई-टॉइलेट
  • गझिबो, व्हर्टिकल गार्डनची संकल्पना
  • आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वास्तुविशारदांकडून नियोजन.