कामगार कल्याणकारी भूमिका / उपक्रम

कामगार कल्याणकारी भूमिका / उपक्रम

पिंपरी-चिंचवड शहराची ओळख “कामगारनगरी” अशी आहे. उद्योगधंद्यांचे शहर असल्यामुळे कामगारांची वस्ती मोठी आहे. भूमिपूत्र असलेले अनेक नागरिक कंपन्यांमध्ये काम करीत आहेत. त्यामुळे कामागारांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही कायम पुढाकार घेतला आहे.

औद्योगिक पट्टयातील ४३ कंपन्यांमध्ये विविध संघटनांच्या माध्यमातून काम करणाऱ्या १० हजार ८०० पेक्षा जास्त कामगार बंधुंसोबतआम्ही कार्यरत आहोत. तसेच, स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना, टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियन, शिव गर्जना कामगार संघटना आदींच्या माध्यमातून आम्ही कामगारांच्या हक्काचा व उत्कर्षाचा लढा अविरत सुरू ठेवला आहे.

संघटनांच्या माध्यमातून केलेली कामगिरी

  • महिंद्रा लॉजिस्टिक कंपनीतील ४०२ कामगारांना पूर्णवेळ नोकरी.
  • पीएमपीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी नवीन दराप्रमाणे वेतननिश्‍चिती.
  • कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून कल्याणकारी योजना.
  • कामगारांच्या मुलांसाठी स्पर्धा, शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आदी उपक्रम राबवले जातात.
  • कामगार विमा रुग्णालयाच्या मागणीसाठी विधीमंडळात लक्षवेधी मांडली.
  • गुणवंत कामगारांचा गौरव सोहळा
  • बांधकाम कामगारांना सुरक्षा साहित्याचे वाटप.