क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन
पिपरी-चिंचवडची वाटचाल 'स्पोर्टस सिटी'च्या दिशेने
चला घडवुया आपण आंतरराष्ट्रीय खेळाडू एकजुटीने!
उद्योगनगरी असलेल्या पिंपरी-चिंचवडची ओळख (“स्पोर्टस् सिटी” अशी निर्माण झाली पाहिजे. यासाठी आम्ही कायम आग्रही आहोत. त्यासाठीच भोसरी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकूल साकारत आहे. भोसरीतच बंदीस्त गॅलरी असलेले स्पोर्टस् कॉम्प्लेक्स उभारण्यात येत आहे. तसेच, आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्केटिंग ग्राउंड इंद्रायणीनगरला लोकार्पण करण्यात आले.
जाधववाडी चिखली येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मल्टीपर्पज स्पोर्टस् कॉम्प्लेक्स उभारण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली आहे. चऱ्होली येथे जलतरण तलावाचे काम पूर्ण झाले आहे. अण्णासाहेब मगर स्टेडियमला गतवैभव प्राप्त करुन पिंपरी-चिंचवडचा नावलौकिक “स्पोर्टस् सिटी” असा व्हावा. यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
परिसरनिहाय क्रीडा संकुले
- स्केटिंग ग्राउंड : इंद्रायणीनगर
- बास्केट बॉल मैदान : सेक्टर ९, मोशी-प्राधिकरण.
- बॅडमिंटन कोर्ट : गवळीनगर, हनुमान कॉलनी.
- टेनिस कोर्ट आणि हॉलिबॉल : सेक्टर ४, मोशी-प्राधिकरण.
- भोसरी मल्टिपर्पज स्पोर्टस गॅलरी : गावजत्रा मैदान, भोसरी.
- जलतरण तलाव : चऱ्होली.
- चिखली मल्टिपर्पज स्पोर्ट्स कॉम्पेक्स : रिव्हर रेसिडेन्सीजवळ, जाधववाडी.
- प्ले ग्राउंड : सेक्टर १०, भोसरी एमआयडीसी.
- आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्तीकेंद्र : गावजत्रा मैदान, भोसरी.
- प्ले ग्राउंड : सेक्टर १९, शरदनगर, चिखली.
अण्णासाहेब मगर स्टेडिअममध्ये स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी उभारणार
पिंपरी-चिंचवडमधील अण्णासाहेब मगर स्टेडिअमची स्थापना ३५ वर्षांपूर्वी करण्यात आली. राज्य शासनाच्या कामगार कल्याण मंडळाच्या पुढाकाराने हे स्टेडिअम तयार करण्यात आले. मात्र, त्यानंतर या मैदानाच्या विकासासाच्या दृष्टीने विचार करण्यात आला नाही. या मैदानावर शहरातील अनेक खेळाडू घडले. आजच्या वाढणाऱ्या शहरीकरणासोबत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सर्वप्रकारचे खेळ शिकवले जावेत. त्यासाठी या मैदानवर स्पोर्टस युनिव्हर्सिटी करण्यात यावी, असा आमचा संकल्प आहे.
