चिखली-मोशी-चऱ्होली “रेसिडेन्सिअल कॉरिडॉर”

चिखली-मोशी-चऱ्होली “रेसिडेन्सिअल कॉरिडॉर”

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या चिखली, मोशी, चऱ्होली या पट्टयात सध्यस्थितीला शेकडो नवीन गृहपकल्प विकसित झाले आहेत. तसेच, तब्बल २३८ गृहनिर्माण सोसायट्यांची नोंदणी आहे. या परिसराला इंद्रायणी नदीच्या किनारा लाभलेला (रिव्हर फ्रन्ट) भाग म्हणून या गावांची ओळख आहे. मध्यम व उच्चभ्रू लोकांची वस्ती या परिसरात आहे.

तळेगाव, रांजणगाव आणि चाकण औद्योगिक वसाहत, पुण्यातील विमाननगर, कल्याणीनगर, तळवडे आयटी पार्क, पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ आदी महत्त्वाच्या भागांशी जोडणारा पट्टा म्हणून चिखली-मोशी-चऱ्होली “रेसिडेन्सिअल कॉरिडॉर”विकसित होत आहे. या भागातील पायाभूत सोयी-सुविधा सक्षम करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. भोसरी विधानसभा मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी हाती घेतलेल्या “भोसरी व्हीजन २०२०” या अभियानांतर्गत आयोजित केलेले बहुतेक प्रकल्प या *कॉरिडॉर'”मध्ये येत आहेत.

वास्तविक, महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर या गावांचा विकास नियोजनबद्ध करणे अपेक्षित होते. मात्र, तत्कालीन सत्ताधाऱ्यांच्या उदासीनतेमुळे या गावांचा नियोजनबद्ध विकास होवू शकला नाही. त्यामुळे सध्यस्थितीला विकासाचा वेग पाहता आम्ही आंतरराष्ट्रीय दर्जाचा सफारी पार्क, अद्ययावत क्रीडा संकूल, मंजूर विकास आराखड्यातील रस्ते रुंदीकरण, आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र, वेस्ट टू एनर्जी, सी न्ड डी वेस्ट पासून ब्रीक्स निर्मीती, इंद्रायणी नदीसुधार प्रकल्प (नमामी इंद्रायणी), मैला शुद्धीकरण प्रकल्प, जलशुद्धीकरण प्रकल्प, उद्यान, क्रिडांगणे आदी महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले आहेत. यातील बहुतेक प्रकल्प प्रगतीपथावर आहेत.

त्यामुळे आगामी काळात पिंपरी-चिंचवडमधील अत्यंत सोयी-सुविधायुक्त असलेला प्रशस्त *रेसिडेन्सिअल कॉरिडॉर”म्हणून चिखली-मोशी-चऱ्होली या भागाची ओळख राष्ट्रीय स्तरावर होणार आहे. तसेच, महाराष्ट्रातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारा “कॉरिडॉर” म्हणून ओळखला जाणार आहे.