जलद आणि किफायतशीर प्रवास सुविधा

नाशिक-फाटा ते चाकण/ पिंपरी ते निगडी /मल्टिमोडल हब

पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी भाजप सरकारने स्वारगेट ते पिंपरीपर्यंत मेट्रो हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला. पण, शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी पिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो साकारण्यात यावी, अशी नागरिकांची मागणी होती. त्यासाठी शहरातील विविध सामाजिक संस्था, संघटनांनी आवाज उठवला होता. अशा संस्था, संघटनांना पाठिंबा दर्शवत आम्ही राज्य आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. त्याला यश मिळाले आहे. केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर निगडीपर्यंतच्या मेट्रोचे काम सुरू करण्यात येणार आहे.

पिंपरी ते दापोडी या मार्गावरील मेट्रो सुविधा या वर्षाअखेर प्रायोगिक तत्त्वावर कार्यान्वयीत होणार आहे. तसेच, पुण्याप्रमाणे पिंपरी-चिंचवडमध्ये मेट्रोचा विस्तार सर्व भागांत व्हावा, या हेतूने सध्याच्या कॉरिडॉर-एक च्या कासारवाडी स्थानकापासून चाकणपर्यंतच्या मेट्रो मार्गाची संकल्पना आम्ही मांडली. त्यासंबंधित “डीपीआर” अर्थात प्रकल्प अहवालाचे काम प्रगतीपथावर आहे. सदर मार्गाचे विस्तारीकरण कासारवाडी ते हिंजवडी होणार आहे. यामुळे भोसरी, मोशी आणि चाकण परिसर हा पुणे आणि हिंजवडी आयटी पार्कशी जोडला जाणार आहे. प्रवाशांना कमी खर्चात सुलभ प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच, निगडी येथील आण्णाभाऊ साठे बस टर्मिनल येथे स्वारगेट येथील प्रस्तावित मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट हब प्रमाणे हब उभारण्यात येणार आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी प्रवाशांना वाहतुकीचे विविध पर्याय (मेट्रो, पीएमपीएमएल, एसटी, कॅब व रिक्षा) उपलब्ध होणार आहेत. त्याचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू केले आहे.

पिपरी-चिंचवड शहरातील मेट्रो स्थानकांचा मार्ग