देशातले पहिले संविधान भवन

लोकशाही देशातील नागरिकांच्या हकांचे होईल अध्ययन,

त्यासाठीच चिखलीत साकारले जातेय संविधान भवन!

राज्यघटनेचा अभ्यास आणि जनजागृती

संविधान साक्षरता म्हणजे सृजनशील व सुसंस्कृत समाज. सृजनशील व सुसंस्कृत समाज म्हणजे सशक्त भारत, त्यामुळे हे भवन झाल्यास हे भारतातील पहिले संविधान भवन असेल. त्याचा मान हा आपल्या महाराष्ट्र राज्याला मिळेल. याचा सकारात्मक दृष्टीने विचार करुन देशातील पहिले संविधान उभारण्यात यावे. याबाबत पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरणामार्फत आम्ही पुढाकार घेतला.

संविधान भवन उभारण्याचा हेतू काय?

प्राधिकरणाच्या पेठ क्र.११ मधील ५ एकर प्रशस्त जागेवर प्राधिकरणामार्फत संविधान भवन व विपश्यना केंद्राचे बांधकाम करता येऊ शकेल. या संविधान भवनामध्ये भारतीय संविधानाबाबतची संपूर्ण माहिती, संविधान निर्मितीबाबतचा  इतिहास आणि संविधान निर्मितीमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान व भारतीय नागरिकांना संविधानाने दिलेले अधिकार व कर्तव्य याबाबतची माहिती विविध माध्यमातून व्हावी, असा हेतू आहे.

संविधान भवनमध्ये नागरिकांना काय मिळेल?

  • संविधान भवनमध्ये भव्य असे ग्रंथालय असेल.
  • विविध स्पर्धा परीक्षा देणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाच्या सुविधा तसेच याठिकाणी आवश्यकतेनुसार कॉन्फरन्स्‌ रुम असेल.
  • वाढत्या ताणतणावामुळे शारिरीक व्याधींना सामोरे जावे लागते. यावर विपश्यना (मेडीटेशन) हा उत्तम मार्ग असल्याचे
  • सिध्द झाले आहे. यासाठी संविधान भवनाच्या बाजूला विपश्यना केंद्र (मेडीटेशन केंद्र) उभारणे शक्‍य आहे. विपश्यना केन्द्र हे
  • शहरापासून दूरवर शांत निसर्गरम्य असावे, तसेच या परिसरात जास्त वर्दळ नसावी, अशी व्यवस्था केली जाणार आहे.
  • पिंपरी चिंचवड शहरात या प्रकल्पामुळे विद्यार्थी, नागरिक व पर्यटक आकर्षित होऊ शकतील आणि प्राधिकरणामार्फत एक राष्ट्र उपयोगी व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे उत्तम असे केंद्र होईल.

प्रकल्पाची सध्यस्थिती काय आहे?

प्राधिकरण सभेच्या ठरावानुसार संविधानाची संकल्पना, घटनाक्रम , संविधानाचे महत्व इ. बाबत माहिती असणाऱ्या तज्ञ व्यक्तींचा समावेश असलेल्या समितीमार्फत निर्णय होणे अपेक्षित आहे. तसेच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधान भवनात अब्दुल कलाम ग्रंथालय व अटल अध्यासन केंद्र व्हावे ज्याचा शहरातील युवकांना फायदा होईल, अशी माझी संकल्पना आहे.