देहू आळंदी पुणे पालखी महामार्ग

देहू आळंदी पुणे पालखी महामार्गाला दिली चालना

माझ्या वारकरी बांधवांची पूर्ण झाली मनोकामना

वारकरी बांधवांच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या पालखी महामार्गाचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित होते. मात्र वारक-यांच्या मागणीनुसार मी महापालिका स्थायी समिती सभापती असताना या रस्त्याच्या कामाला चालना दिली. २०१८ मध्ये रस्त्याचे काम पूर्ण झाले. त्यामुळे पालखी महामार्गातील अडथळे कमी झाल्यामुळे सहापदरी महामार्ग सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध झाला आहे. पालखी महामार्गाचे काम पूर्ण झाल्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून वारकरी बांधवांच्या चेह-यावर समाधान दिसत आहे. तसेच, आळंदी-बोपखेल रस्त्यावर ९ बस स्टेशन बांधण्याचे नियोजन केले आहे. या प्रकल्पाची अंदाजपत्रकीय रक्‍कम ८.३१ कोटी इतकी आहे. या कामालासुद्धा प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. प्रस्तावित बस स्टेशनमध्ये बी.आर. टी. एस. सेवे करिता ३.५ मी. रुंदीच्या स्वतंत्र मार्गिका, स्वयंचलित दरवाजे प्रवाशांना बसण्यासाठी प्रक्षस्त आसन व्यवस्था, चार बस थांबू शकतील एवढा प्रक्षस्त बस स्टेशन अशा सुविधा आहेत. यामुळे प्रवाशांना आळंदी येथे येणाऱ्या बस प्रवासासाठी विना अडथळा मार्ग उपलब्ध होणार आहे. मरकळ व चाकण येथील एम. आय. डी. सी. साठी जवळचा बी.आर. टी. एस. मार्ग म्हणून नवीन पर्याय असेल. तसेच, वेगाने विकसित होणाऱ्या दिघी, चऱ्होली, वडमुखवाडी भागातील बस प्रवाशांसाठी पुणे व भोसरी येथे जाण्यायेण्यासाठी विना अडथळा मार्ग निर्माण होणार आहे.

नागरिकांना मिळणारे लाभ

  • ज्ञानेधर महाराजांच्या पालखी सोहळ्या करिता प्रक्षस्त मार्ग.
  • आळंदी येथे येणाऱ्या भाविकांसाठी प्रक्षस्त मार्ग.
  • मरकळ व चाकण येथील एम. आय. डी. सी. साठी जवळचा प्रक्षस्त मार्ग.
  • वेगाने विकसित होणाऱ्या दिघी, चऱ्होली, वडमुखवाडी भागातील मुख्य प्रक्षस्त मार्ग.