पंतप्रधान आवास… प्रभावी अंमलबजावणी

देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कारभार खास…

सर्वसामान्यांच्या “स्वप्न'पूर्तीसाठीची योजना पंतप्रधान आवास !

देशातील सर्वसामान्य नागरिकांना हक्काचे घर उपलब्ध व्हावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वाकांक्षी योजना आणली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सध्या महानगरपालिकेच्या मंजूर विकास आराखड्यात वेगवेगळ्या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरे (EWS) व बेघरांसाठी घरे (HDH) याकरिता जागांची आरक्षणे आहेत. त्यापैकी मनपाच्या १० जागांवर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरे बांधणेचे नियोजन करणेत येत आहे.

“सर्वांसाठी घरे-२०२२" या संकल्पनेतील समाविष्ट घटक

  • जमिनीचा साधनसंपत्ती म्हणून वापर करुन त्यावरील जुन्या घरांचा आहे तेथेच पुनर्विकास करणे.
  • कर्ज संलग्न व्याज, अनुदानाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न घटकांसाठी परवडणाऱ्या घरांची निर्मिती करणे.
  • खाजगी भागीदारीद्वारे परवडणाऱ्या घरांची निर्मिती करणे.
  • आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांद्रारे वैयक्तिक स्वरुपातील घरकुल बांधण्यास अनुदान

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न पिपरी-चिंचवडमध्ये पूर्ण होणार

  • पंतप्रधान आवास योजनेमध्ये शहरी गरीबांसाठी परवडणाऱ्या दरातील घरांची निर्मिती केली जाणार.
  • सन २०२२ पर्यंत देशात २ कोटी घरे बांधण्याचे केंद्र सरकारचे उद्दीष्ट.
  • पिंपरी चिंचवड शहरामध्ये चऱ्होली, रावेत, बोऱ्हाडेवाडी, आकुर्डी व पिंपरी आरक्षण क्र.७७ या ठिकाणी प्रकल्प उभारणी कामाचे भुमीपूजन समारंभ दि.०९/०१/२०१९ रोजी मा.मुख्यमंत्री, श्री.देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते पार पाडला.
  • सन २०१९-२० चे अंदाजपत्रकामध्ये सदर कामांसाठी व नव्याने सुरु होणाऱ्या प्रकल्पांसाठी र.रू.१७७ कोटी एवढी तरतुद करण्यात आलेली आहे.
  • सदर योजनेचा आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना फायदा होणार आहे.
  • प्रकल्पाचा निर्धारित वेळ कामाचे आदेश दिल्यापासून ३० महिने इतका राहणार आहे.
  • सदर योजनेमध्ये केंद्र शासन र.रु.१ लाख व राज्य शासन र.रु.१.५ लाख उर्वरित र.रु.६.६९ लाख हिस्सा लाभार्थी
  • यांच्याकडून घेणेत येणार आहे.
  • तसेच, सदर प्रकल्पासाठी मुलभूत सुविधाकरिता येणारा खर्च, जागेची किंमत, आकस्मिक व आस्थापना शुल्क
  • या करिता महानगरपालिकेमार्फत खर्च करण्यात येणार आहे.

भोसरीतील १० हजार कुटुंबांना हक्काचे घर

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत भोसरी विधानसभा मतदार संघातील सुमारे १० हजार कुटुंबांना या योजनेंतर्गत हक्काचे घर उपलब्ध होणार आहे. भोसरीतील चऱ्होली, बोऱ्हाडेवाडी, चिखली प्राधिकरण आणि मोशी प्राधिकरण या ठिकाणी म्हाडा, पिंपरी-चिंचवड महापालिका, नवनगर विकास प्राधिकरण यांच्या पुढाकाराने या सदनिका उभारण्यात येणार आहेत.