पाणी पुरवठा सक्षमीकरणाचा संकल्प

आद्रा भामा आसखेड योजना

पिंपरी-चिंचवड शहराची तहान ही आजच्या दिवशी फक्त पवना धरणावर अवलंबून आहे. वाढत्या शहरीकरणाच्या क्रमवारीत पिंपरी-चिंचवडचा देशात तिसरा क्रमांक लागतो. तत्कालीन राज्यकर्त्यांच्या दूरदृष्टीच्या अभावामुळे पिंपरी-चिंचवडसाठी आंद्रा-भामा आसखेड धरणातून पाणी उपलब्ध करुन देण्याची योजना केवळ कागदावरच राहिली. गेल्या अनेक वर्षांपासून प्रस्ताव रखडला होता.

प्रस्तावित योजनेनुसार, मावळ आणि खेड तालुक्‍यातील या दोन धरणांतून पिंपरी-चिंचवडसाठी पाणीसाठा आरक्षित करण्यात आला होता. मात्र, तत्कालीन राज्यकर्त्यांच्या उदासीनतेमुळे पुन:स्थापना खर्च भरण्यास टाळाटाळ करण्यात आली. परिणामी, पिंपरी- चिंचवडकरांना अनेक वर्षांपासून हक्काच्या पाण्यापासून वंचित रहावे लागले.

दरम्यान, शहरातील पाणी समस्या निकालात निघाली पाहिजे. पाणी कपात, पाणीटंचाईचे भविष्यातील संकट डोळ्यांसमोर होते. त्यामुळे पवना, आंद्रा आणि भामा आसखेड प्रकल्पातून पाणी उपलब्ध व्हावे. याकरिता आम्ही मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस आणि संबंधित खात्यांच्या मंत्र्यांकडे पाठपुरावा केला सुरू केला. भामा आसखेड प्रकल्पग्रस्तांच्या पुर्नवसनाचा प्रश्न मार्गी लागला. शहरातील पाणी समस्या सोडवण्यासाठी ही योजना महत्त्वाकांक्षी आहे.

महापालिकेमार्फत शहराच्या चिखली, चऱ्होली, वडमुखवाडी, दिघी आणि मोशी परिसरात पाणीपुरवठा होण्यासाठी नियोजित भामा आसखेड प्रकल्प राबविण्याची प्रक्रिया सुरू आहे. आगामी हा दीड वर्षांत हा प्रकल्प कार्यान्वयीत होणार आहे. या प्रकल्पामुळे भोसरी मतदार संघातील समाविष्ट गावांतील पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. तसेच, या प्रकल्पाची मर्यादा वाढण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. राज्य सरकारकडे महापालिका प्रशासनाने पाणी आरक्षणाबाबत पैसे भरले आहेत. त्यामुळे आगामी १५ वर्षांसाठी पाणी आरक्षण करुन मिळाले आहे.

प्रकल्पाची वैशिष्टे काय आहेत?

  • पहिल्या टप्प्यात १०० एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्प.
  • तळवडे, चिखली, मोशी, चऱ्होली, डुडूळगाव, दिघीमधील पाणीप्रश्न कायमचा निकालात निघणार.
  • दुसऱ्या टप्प्यात २०० एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्प.
  • २०४५ पर्यंतच्या लोकसंख्या वाढीचा विचार करुन नियोजन.
  • टँकरमूक्त भोसरीचा संकल्प पूर्ण होणार.