बांधकाम राडारोडापासून वीट निर्मिती

बांधकाम राडारोडापासून वीट निर्मिती

शहरात ठिकठिकाणी पडलेला बांधकामाचा राडारोडा जमा करून त्यापासून खडी, टाइल्स व पेव्हिंग ब्लॉक तयार करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पिंपरी-चिंचवड महापालिका पर्यावरण विभागामार्फत मोशी येथे राबविण्यात येणार आहे.

शहरात सुका कचरा जिरविण्यासाठी देखील जागा अपुरी पडत असल्याने प्रशासन नव्या जागेच्या शोधात आहे. जुन्या इमारती व बांधकामे पाडल्यानंतर राडारोडा कुठे टाकयचा? हा प्रश्न वारंवार पडलेला असतो. त्यामुळे बऱ्याचदा हा कचरा रस्त्यावरच पडून किंवा मोकळ्या जागी हा राडारोडा टाकला जातो, त्यामुळे नदीपात्राची रुंदी कमी होत आहे. नदी प्रदूषण टाळण्यासाठी देखील केंद्र सरकारनेही सूचना दिल्या होत्या. सुमारे ३० कोटी रुपयांपर्यंत या प्रकल्पासाठी खर्च अपेक्षित आहे. ही रक्कम केंद्रकडून दिली जाणार आहे. दिल्लीत हा प्रकल्प उभारलेला आहे. त्याच प्रकल्पावर आधारीत पिंपरी-चिंचवडमध्ये हा प्रकल्प उभा करणार आहे. त्यामुळे प्रदूषण कमी होणार आहे. शहरातील राडारोडा उचलला जाईल. राडारोड्यापासून टाइल्स, पेव्हिंग ब्लॉक अशा वस्तू तयार केल्या जाणार आहेत. त्यांची विक्री करण्याचा अधिकार त्या कंपनीला असेल. आवश्यकता भासल्यास महापालिका त्यातील ३० टक्के वस्तू खरेदी करु शकणार आहे.

बांधकाम राडारोडा (C & D Waste) प्रक्रिया प्रकल्प शहरातून गोळा होणाऱ्या बांधकामाच्या राडारोड्यावर (C & D Waste)  शास्त्रोक्त पध्दतीने प्रक्रिया करुन त्याचा पुनर्वापर करणेसाठी 801 तत्वावर प्रकल्प उभारणेत येत आहे. या अंतर्गत शहरातील राडारोडा सप्टेंबर २०१९ पासून गोळा करणेची यंत्रणा कार्यान्वित करणेत येत आहे.

या प्रकल्पाचा फायदा काय?

  • शास्त्रोक्त पद्धतीने राडारोड्याची विल्हेवाट लावणे शक्‍य.
  • पर्यावरणाचा ऱ्हास कमी होण्यास मदत. हवेतील धुलीकण कमी होण्यास मदत होईल.
  • पुनर्वापर पद्धतीमुळे नैसर्गिक संपती वाचविण्याचा प्रयत्न.
  • शहरात मोठ्याप्रमाणावर नागरीकरण होत आहे. परिणामी बांधकाम वाढले.
  • रहिवासी, व्यापारी तसेच आद्योगिक आदी कारणामुळे मोठ्याप्रमात राडारोडा निर्माण होतो.
  • सद्यस्थितीत शहरात कुठेही बांधकाम राडारोडाची विल्हेवाट लावण्याची सोय नाही.
  • घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ नुसार शहराला राडारोडा शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे नियमाने बंधनकारक आहे