भक्ती शक्ती चौकात तीन मजली उड्डाणपूल
भक्ती शक्ती चौकात तीन मजली उड्डाणपूल
जुना पुणे-मुंबई महामार्गावरील अत्यंत मोक्याचे आणि शहराचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भक्ती-शक्ती चौकात वाहतूक समस्या जटील बनली होती. त्यावर तोडगा काढण्यासाठी नावीन्यपूर्ण रोटरी पुलाचे नियोजन केले आहे. भक्ती शक्ती चौक निगडी येथील ग्रेड सेपरेटर व उड्डाणपूल साकारण्यात येणार आहे. पुणे मुंबई रस्त्यावरील बेशिस्त वाहतुकीमुळे अनेक अपघात घडले आहेत. त्यामुळे या चौकातील वाहतुकीचे सक्षमीकरण करण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला आहे.
भक्ती-शक्ती ते मुकाई चौक हा ४५ मी. रूंद बीआरटीएस रस्ता विकसीत करणेत येत आहे. तसेच, राष्ट्रीय महामार्गातर्फे देहू रोड ते निगडी या राष्ट्रीय हमरस्त्याचे रुदीकरणाचे काम लवकरच चालू करणेत येणार आहे. भक्ती-शक्ती चौकामध्ये बीआरटीएसचे टर्मिनल बांधणेचे काम पूर्ण झाले आहे. वर्षाअखेरीस निगडी-दापोडी बीआरटीएस बस सेवा चालू झाली आहे.
सदर प्रकल्पामुळे होणारे फायदे
- प्राधिकरण ते मोशी दक्षिण-उत्तर वाहतुकीमुळे शहर जोडले जाणार.
- नाशिक महामार्गाकडून देहूरोड कात्रज बाहयवळण मार्गाकडे जाणारी जड वाहने ग्रेड सेपरेटर मधून जाणार.
- रोटरीमुळे पादचा-यांना चौकाचे कोणत्याही दिशेने ये-जा करणे शक्य.
- जवळच भक्ती शक्ती चौक असल्याने पर्यटकाची गर्दी होत असल्याने पदचा-यांना याचा चांगला फायदा होणार आहे.
- चौक सिग्नल फ्री असल्याने पादचारी व वाहने यांना थांबावे लागणार नाही.
- वाहनांचे इंधनामध्ये व वाहनचालकांचे वेळेमध्ये बचत होणार आहे.
- बीआरटी बस सेवेची वारंवारता कायम राखणेस मदत होणार आहे.
- प्राधिकरणाकडुन पुणे भोसरी व मुंबईकडे जाण्यासाठी प्राधिकरण हद्दीमधुन स्वतंत्र पूल.
- शहराचे सौदर्यामध्ये भर पडणार असुन नाशिक फाटा उड्डाणपुलाप्रमाणे एक मानबिंदू होणार आहे.
