रुग्णसेवेचा विचार ; गरजूंना आधार !

रुग्णसेवेचा विचार ; गरजूंना आधार !

मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून भोसरी विधानसभा मतदार संघातील १५६ गरजु रुग्णांना तब्बल १ कोटी ६५ लाख रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेची जनजागृती आणि प्रभावी अंमलबजावणी तळागाळातील लोकांपर्यंत केली. त्याचा फायदा भोसरी विधानसभा मतदार संघातील रुग्णांना झाला आहे.

तसेच, ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा ६५ वरून ६० करण्यात यावी. त्यांना रक्तदाब व मधुमेह असल्यास औषधे मोफत द्यावीत. महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेत ज्येष्ठांचा समावेश करावा. ज्येष्ठांसाठी स्वतंत्र आयुक्तालय स्थापन करावे, आदी मागण्यांसाठी ज्येष्ठ नागरिक महासंघाने राज्यातील जिल्हाधिकारी व तहसिलदार कार्यालयासमोर आंदोलने केली होती. काही शहरांमध्ये ज्येष्ठांसाठी हेल्पलाईन सुरू आहेत. त्यावर तक्रार केल्यास पोलीस मध्यस्थी करू शकतात. मात्र, तक्रार दाखल करू शकत नाहीत. पालक आणि ज्येष्ठ नागरिक परिक्षा आणि कल्याण अधिनियम २००७ या कायद्यानुसार ज्येष्ठ नागरिकांना मासिक खर्च देण्याचे दायित्व मुलांवर असावे. तसेच, ज्येष्ठांचे जीवन व मालमत्ता सुरक्षित रहावी. अशा तरतूदी राज्य सरकारच्या धोरणात करण्यात याव्यात, अशी मागणी आम्ही विधानसभेत केली होती. त्याबाबतही भाजप सरकार सकारात्मक विचार करीत आहे.

रुग्णाना आधार देण्याचा प्रामाणिक प्रयत्न

भोसरी विधानसभा मतदार संघातील सर्वच मोठ्या रुग्णालयांमध्ये आम्ही आमदार कार्यालय प्रतिनिधी नियुक्‍त केला आहे. त्यांच्याआधारे आपण रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यापासून ते त्याला “डिस्चार्ज’ मिळेपर्यंत सर्व मदत केली जाते. कोणत्याही व्यक्‍तीला रुग्णालयासंदर्भात कोणतीही समस्या उद्‌भवू नये, अशी आमची संकल्पना आहे. महापालिकेच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात आम्ही सुरू केलेल्या “डेस्क’ ला चांगला प्रतिसाद मिळत आहे. रुग्णांच्या चेहऱ्यावरील समाधान हेच आमचे यश आहे. अशाप्रकारे भोसरीतील आरोग्य सुविधा सक्षम करण्याबाबत आगामी काळात आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत.