विकासाचे मॉडेल चऱ्होली

समाविष्ट गावांच्या विकासाला मिळाली चालना,

२२ वर्षांपासून अधुरी असलेली पूर्ण झाली मनोकामना !

समाविष्ट गावांमधील “चऱ्होली” हे गाव विकासासाठी एक मॉडेल बनले आहे. चऱ्होली गेली २२ वर्षांपासून महापालिकेत आहे. मात्र, गावामध्ये विकास आराखड्यातील रस्ते झालेले नव्हते आणि मूलभूत सोई-सुविधाही नव्हत्या. समाविष्ट गावांपैकी चऱ्होली म्हणजे आसपास तब्बल बारा वाड्या-वस्त्यांचा हा परिसर. शेतकऱ्यांचा भाग अशीच ओळख होती.

भोसरी मतदार संघातील चऱ्होली, मोशी, चिखली, तळवडे, दिघी ही गावे पालिकेत समाविष्ठ होउन तब्बल दोन दशके उलटली होती. समाविष्ठ भागाने आजवर प्रामाणिकपणे केवळ कर भरण्याचे काम केले. जेवढ्या प्रमाणात कर भरला तेवढ्या प्रमाणात निधी उपलब्ध न झाल्यामुळे या भागाचा विकास झाला नाही. त्यामुळे “भोसरी व्हीजन-२०२०’च्या माध्यमातून आम्ही समाविष्ट गावांच्या विकासासाठी कायम प्रयत्नशील राहणार आहोत.

चऱ्होलीतील विकासकामे

  • भूमिगत वीज वाहिन्या.
  • विकास आराखड्याप्रमाणे रस्त्याचे जाळे.
  • मैलाशुद्धाकरण प्रकल्प टप्पा- २
  • वाघेश्वर मंदीर उद्यानाचे काम.
  • अद्ययावत स्मशानभूमी.
  • जलतरण तलाव टप्पा- २
  • क्रिडांगण कामचालू
  • पंतप्रधान आवास योजने अंतर्गत १४४२ घरांची निर्मिती. इंद्रायणी सुधार प्रकल्प सर्वे पुर्णत्वास व तात्काळ कामास सुरूवात.

विकास आरख्ड्या प्रमाणे रस्त्याचे जाळे केले निर्माण..

  • भक्‍ती-शक्‍ती निगडी ते वाघोली व्हाया चऱ्होली
  • पिंपरी-चिंचवड ते पुणे-नगर हायवे व्हाया चऱ्होली विकास आरख्ड्या प्रमाणे रस्ते व पायाभूत सुविधा निर्माण झाल्यामुळे गृहप्रकल्प क्षेत्रामध्ये चऱ्होली अग्रस्थानी..!