संतपीठ

महाराष्ट्रातील संत विचारांच्या विद्यापीठाची स्थापना

अध्यात्म, आधुनिकतेचा ध्यास घेतला, चिखलीत संतपीठाचा पाया रोविला !

पुणे म्हणजे “शिक्षणाचे माहेरघर” म्हणून ओळखले जाते. पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरास अध्यात्मिक व संत साहित्याचा, संगीत कलेचा प्रगल्भ वारसा लाभला आहे. जगद्रगुरू संत तुकाराम महाराज, संतश्रेष्ठ ज्ञानेधर महाराज यांची कर्मभूमी म्हणून हा परिसर ओळखला जातो. या महान संतांचे विचार हे आजच्या पिढीपर्यंत पोहोचविणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळेच आपल्या मातीत झालेल्या संतांची ओळख होऊन त्यांच्या मनात आपल्या संत साहित्याप्रति आदर निर्माण होणार आहे. त्याअनुषंगाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने परिसरातील मुलांना अत्याधुनिक शिक्षणासह संतसाहित्य, संगीत कला इ.चे शिक्षण देणारी संस्था निर्माण करण्यात यावी, अशी अपेक्षा येथील वारकरी संप्रदायाशी संबंधित नागरिकांची होती.

दरम्यान, आम्ही “भोसरी व्हीजन- २०२० उपक्रमांतर्गत शहरात संत साहित्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी तसेच संत साहित्याचा अभ्यास-अध्ययन करता यावे म्हणून “संतपीठ”” उभारण्याची संकल्पना हाती घेतली. टाळगाव- चिखली येथे हे महाराष्ट्रातील पहिले संतपीठ उभारले जात आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

कसे असेल संतपीठ आणि फायदे काय?

  • तळमजला अधिक ५ मजले अशी इमारत.
  • एकूण बांधकाम क्षेत्र १३१६१.७१ चौ. मीटर आहे.
  • एकूण ४ उद्‌वाहक नियोजित आहेत.
  • दिव्यांग मुले/व्यक्तींकरिता “रॅम्प’ची सुविधा
  • एकूण ४८ वर्गखोल्या, ३ कार्यालये, ७ प्रयोगशाळा, ३ संगणक कक्ष, २ सभागृह
  • संगीत तथा वाद्य कक्ष असेल
  • प्रत्येक मजल्यावर स्वच्छतागृह, मैदान इ.
  • विद्युत, अग्निशमन व्यवस्था असेल.
  • पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडून सुरू होणारी पहिली सीबीएसई शाळा संतपीठाच्या माध्यमातून उभारली जाईल.
  • आधुनिक शिक्षण आणि अध्यात्मिक शिक्षण घेवून प्रतिभावंत विद्यार्थी घडवणारी संस्था शहराला मिळणार आहे.
  • राज्यातील पाहिल्या संतपीठाच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवडची स्वतंत्र ओळख निर्माण होईल. वारकरी सांप्रदायाचा वारसा जोपासला जाणार आहे.

प्रकल्पाची सद्यस्थिती काय ?

संतपीठाच्या इमारतीचे नकाशे व आराखडे तयार करण्यासाठी वास्तुविशारदाची नेमणूक केली आहे. मनपाच्या मंजूर विकास आराखड्यातील चिखलीमधील गट नं.१६५३ मध्ये आरक्षण क्र.१/८९ हे माध्यमिक शाळेकरिता आरक्षित असून, त्याचे एकूण क्षेत्रफळ १.८० हेक्‍टर आहे. सदर जागा ही जिल्हाधिकारी, पुणे यांच्याकडून दि. २६/१२/२०१६ रोजी मनपास ताब्यात दिली आहे. सदर जागेवर संतपीठाकरिता इमारतीचा विस्तृत नकाशा व आराखडा तयार झाला असून मनपाच्या बांधकाम विभागामार्फत परवानगी घेतलेली आहे. तसेच या प्रकल्पाचे काम सुरू असून आगामी दोन वर्षांत पूर्ण होणार आहे.