स्मार्ट सिटी

राहणीमान उंचावणारी स्मार्ट सिटी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील १०० शहरे स्मार्ट बनवण्याचे स्वप्न पाहिले आहे. स्मार्ट सिटी ही संकल्पना प्रत्यक्षात आल्यानंतर या शहरातील नागरिकांचे जीवन सुसह्य होणार आहे. शहरातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी पायाभूत सुविधा, स्वच्छ पर्यावरण, काही नव्या योजनांचा अवलंब यावर स्मार्ट सिटी योजनेत भर देण्यात येणार आहे. शुद्ध पाणीपुरवठा, वीजेची शाश्‍वत उपलब्धता, सॅनिटेशन, सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प, प्रभावी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, माहिती-तंत्रज्ञान सुविधा, वेगवान शहरी सुविधा, ई-गव्हर्नन्स आणि लोकांचा सहभाग, नागरी सुरक्षितता आदी पायाभूत बाबी या स्मार्ट सिटीत असणार आहेत.

सुरुवातील केंद्र सरकारने स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहराची यादी जाहीर केली. त्यावेळी पिंपरी-चिंचवडचा या यादीमध्ये समावेश नव्हता. याबाबत आम्ही राज्य आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा करुन पिंपरी-चिंचवडचा स्मार्ट सिटी योजनेत सहभाग करुन देण्याबाबत आग्रही भूमिका घेतली. या मागणीला यश मिळाले आणि शहराची स्मार्ट योजनेसाठी निवड करण्यात आली आहे.

स्मार्ट सिटी योजनेमुळे नागरिकांना काय मिळणार?

  • कमांड अँड कंट्रोल सेंटर मुळे वाहतूक नियमन करणे सोप्पे होणार, गुन्हेगारांवर वचक राहणार. नागरिकांची सुरक्षितता वाढणार आहे.
  • फायबर ऑपटिक्स या सर्वात जलद इंटरनेट सेवा शासकीय कार्यालयांत, कॉलेज विद्यार्थी यांच्यासाठी वायफाय सुविधा.
  • आपत्कालीन स्थितीमध्ये लोकांना जलद माहिती प्रदान करणे.
  • स्मार्ट किऑस्क द्वारे पालिकेच्या सेवा मिळतील. माहिती देणे, पैसे भरण्याची सोय असेल.
  • पाणी पुरवठा, मैलाशुद्धीकरण प्रक्रिया अधिक कार्यक्षम होणार.
  • पार्किंगची समस्या निकालात निघणार.
  • पालिकेच्या संपूर्ण सेवा एका मोबाईल अँपवर उपलब्ध झाल्याने लोकांचा वेळ, पैसा वाचणार.
  • ई-क्लासरूम द्वारे शाळेतील शिक्षणाचा दर्जा उंचावणार.
  • ईआरपी यंत्रणेमुळे पालिकेची सर्व खाती जोडली गेल्याने कामकाजात सुसूत्रता येणार, माहिती आदानप्रदान जलद होणार, निर्णयप्रक्रियेवर चांगला परिणाम दिसून येईल, कर्मचाऱ्यांची कार्यशीलता वाढणार आहे.
  • सिटीझन डॅशबोर्डमुळे पारदर्शक गव्हर्नस सेवा देणे शक्‍य होणार आहे.

शहर परिवर्तन कार्यालय

नागरिकांचे राहणीमान सुयोग्य होण्यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे. यामध्ये शहरातील तज्ज्ञ नागरिक, सोसायटी, सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींचे मत विचारात घेवून शहराचे धोरण ठरवण्यात आले आहे. त्यानुसार सध्या पिंपरी-चिंचवड दर्शन बससेवा, हेल्थ ऑब्झरवेटरी, प्रोजेक्टची डॅशबोर्डद्रारे प्रकल्पांची सध्यस्थिती एका क्लिकवर आदी उपक्रमांची सुरूवात झाली आहे.