“नमामी इंद्रायणी"

नदी सुधार प्रकल्प..!

देहू-आळंदी तीर्थक्षेत्रांच्या परिसरात वाहणाऱ्या इंद्रायणी नदीची स्थिती बिकट झाली होती. भोसरी व्हीजन-२०२० अभियानाच्या माध्यमातून आम्ही इंद्रायणी नदीसुधार प्रकल्पासाठी सर्वेक्षण केले. त्यामध्ये भराव टाकलेली ठिकाणे, पात्रालगतची गॅरेज, हॉटेल व बांधकामांची माहिती संकलित केली. तसेच, थेट नदीपात्रात मिसळणारे सांडपाणी, नाल्यांची माहिती घेतली आहे. निळी व लाल पूररेषा विचारात घेऊन नद्यांचा विकास करण्याचा संकल्प आहे. त्यासाठी महसूल विभागाकडून नदीपात्राची माहिती, नकाशे मिळविण्यात आले आहेत. तसेच, इंद्रायणी नदीसुधार प्रकल्पाच्या कामालाही सुरुवात झाली आहे.

“नमामी गंगा” च्या धर्तीवर प्रकल्प…

भारत देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्रजी मोदीजी यांनी गंगा नदीच्या संवर्धनासाठी “नमामी गंगा” हा नदीसुधार प्रकल्प हाती घेतला आहे. त्याच धर्तीवर महापालिकेने इंद्रायणी नदीच्या संवर्धन व विकासाकरिता मे. एच.सी.पी. डीझाईन, प्लॅनिंग एन्ड मॅनेजमेंट प्रा. लि. अहमदाबाद (गुजरात) या सल्लागार संस्थेची नेमणूक केली आहे. अहमदाबाद येथील साबरमती रिव्हर फ्रन्ट प्रकल्पाचे काम या संस्थेने केले आहे. संबंधित संस्थेने सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला आहे. त्यानुसार प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे.

प्रकल्पाला स्व. अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव…

पिंपरी-चिंचवडमधील पर्यावरण सक्षमीकरणाच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी असलेल्या इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पास माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याची भूमिका आम्ही घेतली. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांचे दि.१६ ऑगस्ट २०१८ रोजी निधन झाले. त्यावेळी देशाच्या राजकारणातील “भारतरत्न” हरवल्याची भावना सर्वस्तरातून व्यक्त होत होती. आम्ही देहू-आळंदी इंद्रायणी नदीसुधार प्रकल्पाला स्व. अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पिंपरी-चिंचवड परिसरात अटलजींचे नाव अजरामर राहील, असा आमचा मनोदय आहे.

नदीसुधार प्रकल्पातून काय मिळेल?

  • नदीपात्राची स्वच्छता
  • वॉकिंग ट्रॅक, सायकल ट्रॅक, गार्डन, पर्यटन व विरंगुळा केंद्र.
  • नदीपात्र एकात्मिक पद्धतीने स्वच्छ व सुंदर करणे.
  • प्रदूषण आणि पुराचा धोका कमी करणे.
  • नदीचे पुनरुज़ीवन करणे.
  • पाणी पुरर्भरण.
  • सार्वजनिक घाट, सुशोभीकरण.