अद्ययावत व्हेजिटेबल मार्केट
अद्ययावत व्हेजिटेबल मार्केट
भोसरी परिसरातील वाढत्या औद्योगिकीकरणामुळे व नव्याने होणाऱ्या गृहप्रकल्पांमुळे लोकसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या परिसरातील नागरीकांना स्वच्छ वातावरणामध्ये आधुनिक भाजी मंडई व व्यापारी गाळे / ऑफिसेस ची सोय उपलब्ध करुन देणे आवश्यक होते. त्यानुसार भोसरी गावठाण येथील जुनी भाजी मंडई पाडून त्या जागी नवीन भाजी मंडई व व्यापारी संकुल बांधण्याचे काम पूर्ण झाले आहे.
अशाचप्रकारे भोसरी विधानसभा मतदार संघातील सर्व गावांमध्ये भाजी मंडई, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि तत्सम शासकीय सुविधा उपलब्ध करण्याबाबत आम्ही प्रयत्नशील आहोत. रस्त्यावंर भाजी विक्री करणाऱ्या स्टॉल धारकांची संख्या कमी झाल्यास वाहतूक समस्या सुटण्यास मदत होणार आहे. त्यामुळे भोसरी व्हीजन-२०२० या उपक्रमामध्ये आम्ही अद्यायावत व्हेजिटेबल मार्केट उभारण्याचा मनोदय आम्ही केला आहे.
- प्रशस्त पार्किंग आणि व्यापार सुविधा
- शेतकरी ते ग्राहक थेट भाजीपाला विक्री
- सेंद्रिय भाजीपाला उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न.
- महिला बचतगटांना व्यावसायिक व्यासपीठ उपलब्ध होईल.
- विना फेरीवाला परिसर करण्यासाठी मदत होईल.
