ग्रीन भोसरी… क्लीन भोसरी

ग्रीन भोसरी… क्लीन भोसरी

भोसरी व्हीजन-२०२०/ च्या माध्यमातून “ग्रीन भोसरी-क्लीन भोसरी” हा उपक्रम राबवला जात आहे. अविरत श्रमदान आणि महेशदादा स्पोर्टस फाऊंडेशन, सायकलमित्र या संस्थांच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनासाठी विविध उपक्रम आयोजित केले जातात. पर्यावरण जनजागृतीसाठी रिव्हर सायक्‍्लोथॉन घेण्यात आली. त्यामध्ये सुमारे ५ हजार सायकलपटू सहभागी झाले होते. चित्रकला, निबंध आणि वक्तृत्त्व स्पर्धांचे आयोजन केले आहे. इंद्रायणी स्वच्छता अभियान जनजागृती मोहीम आम्ही सुरू केली आहे. त्या माध्यमातून खासगी शाळांमधील ६७ हजार विद्यार्थी आणि शासकीय शाळांमधील ६३ हजार विद्यार्थ्यांसाठी आम्ही पाहिलेली नदी” या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित केली होती.

पुणे ते पंढरपूर, पुणे ते भीमाशंकर, अष्टविनायक तसेच जम्मू-काश्मिर ते कन्याकुमारी आदी मोहीमा आपण सायकलमित्र संस्थेच्या माध्यमातून जनजागृतीसाठी राबविल्या आहेत. वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन उपक्रमांतर्गत दोन हजारहून अधिक वृक्षांचे रोपण केले आहे. संस्थेच्या स्वयंसेवकांमार्फत लावलेल्या वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी नियमित प्रयत्न केले जातात. शनिवार आणि रविवारी स्वयंसेवक पूर्णवेळ वृक्षसंवर्धनासाठी कार्यरत असतात.

प्लॅस्टिकमुक्त भोसरी अभियानाच्या माध्यमातून भाजीवाले, फुलवाले, छोटे व्यावसायिक यांच्यामध्ये जनजागृती उपक्रम राबवले जातात. दिघी येथील दत्तगड डोंगरावर स्वच्छता मोहीम व वृक्षारोपण राबविले जाते.

जलपर्णी मुक्त नदी आणि निर्माल्यमुक्‍त नदी आदी उपक्रमही राबवले जातात. गणेशोत्सवात आम्ही मूर्तीदानासाठी नागरिकांना आवाहन करतो. त्याआधारे जमा झालेल्या मूर्त्यांचे दान केले जाते. भटक्या प्राण्यांसाठी मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन दिली जाते. खिळे व फलक मुक्‍त वृक्ष असे अभियान राबवून आम्ही भोसरीची ओळख आगामी काळात ग्रीन भोसरी-क्लिन भोसरी अशी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत.